You are currently viewing युगादी पाडवा

युगादी पाडवा

कुरुंदवाड जिल्हा सांगली येथील ज्येष्ठ लेखक कवी प्राध्यापक दिलीप सुतार यांची अप्रतिम काव्यरचना

युगादी पाडवा। सण हा प्राचीन।
शुभंकर दिन । सर्वासाठी । ।

शालिवाहन तो । थोर शककर्ता।
प्रारंभ तो कर्ता ।। पाडव्याचा। ।

चैत्रप्रतिपदा । गुढी चे रोहण
आनंदा उधाण । घरोघरी । ।

मुहूर्त हा उत्तम । म्हणे साडेतीन ।
कर्म करा छान । नियमित । ।

व्हावे प्रबोधन । करा संशाेधन ।
आणि निर्मुलन । अंधश्रध्दांचे । ।

गुढी हे द्योतक ।असे आरोग्याचे ।
आणि विजयाचे । चिरंतन । ।

जगा नि जगू द्या। मंत्र थोरअति ।
जाणावी महती । सर्वानीच । ।

करा विद्यारंभ । संकल्प महान ।
व्हावे ते सृजन । मानव्याचे । ।

आम्ही भारतीय । नको भेदाभेद।
व्हावा सुसंवाद । सर्वाशीच । ।

करी अहंकार । माणसाचा घात।
पेटवा ती ज्योत । बंधुत्वाची । ।

गुढी हे प्रतीक । असे आनंदाचे।
नव्हे ते देवाचे । कोणत्याही । ।

संदेश देतात । गुढ्या नी तोरणे।
नसावी धोरणे । धर्मद्वेषी । ।

नसे दिस फक्त ।खरेदी विक्रीचा ।
अर्थ शोधण्याचा। जीवनाचा । ।

सांगे हा ‘सुदिन’ । करा सुरूवात ।
देशात विश्वात। चांगुलपणाची । ।

प्रा.दिलीप सुतार
कुरुंदवाड
मो.नं ९५५२९१६५०१

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =