You are currently viewing प्रत्येक नागरिकाचे नाव आयुष्यमान यादीत समाविष्ट करण्यासाठी मी कटिबद्ध – नितेश राणे

प्रत्येक नागरिकाचे नाव आयुष्यमान यादीत समाविष्ट करण्यासाठी मी कटिबद्ध – नितेश राणे

आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रमाचा मतदारसंघात आज शुभारंभ…

वैभववाडी

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. ज्या लाभार्थ्यांची यादीत नावे नाहीत त्यांनी अजिबात नाराज होऊ नये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित नागरिकांना यादीत समावेश करण्याच्या दृष्टीने स्वतः मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, राजेंद्र राणे, प्राची तावडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा