You are currently viewing वेंगुर्ले भाजपा कार्यालयात डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ले भाजपा कार्यालयात डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ले

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेंगुर्ले भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी अभिवादन करताना राजन तेली म्हणाले की , प्रखर राष्ट्रवादी आणि भारतीय जन संघाचे संस्थापक असलेले डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय ऐक्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली . त्यांनी एका देशात दोन विधान , दोन प्रधान व दोन निशान चालणार नाही अशी कणखर भुमिका घेतली व त्यातच त्यांना आपल्या जिवाचे बलिदान द्यावे लागले असे विचार मांडले .
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , महिला अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत , ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व प्रीतेश राऊळ व संतोष गावडे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , ता.चिटनीस जयंत मोंडकर व सुजाता देसाई , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , अनु.जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण , महीला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे – विजय बागकर – गोविंद मांजरेकर – सुधीर गावडे – संतोष शेटकर – कमलेश गावडे – आनंद गावडे , नगरसेवक प्रशांत आपटे व श्रेया मयेकर , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , परबवाडा उपसरपंच विष्णू उर्फ पपु परब , दादा केळुसकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , युवा मोर्चाचे नारायण कुंभार – भुषण सारंग – प्रीतम उर्फ पिंटु सावंत , महीला मोर्चाच्या रसिका मठकर – सुजाता पडवळ – आकांक्षा परब , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ – निलेश गवस – पुंडलिक हळदणकर – नितीश कुडतरकर , संदिप देसाई , राजन पडवळ , गणपत गावडे , सुनील मठकर , अमित गावडे इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा