You are currently viewing बांदा येथे जागतिक एड्स निर्मुलन दिनानिमित्त जनजागृती रॅली

बांदा येथे जागतिक एड्स निर्मुलन दिनानिमित्त जनजागृती रॅली

सावंतवाडी :

 

 

बांदा येथे आज जागतिक एड्स निर्मुलन दिनाच्या निमित्ताने कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग व गोगटे – वाळके महाविद्यालय बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा शहरात लोकांमध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली बांदा सर्कल पासून बांदा बाजारपेठ ते बांदा बसस्टँड पर्यंत काढण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.जी. काजरेकर, एनएसएस विभागाचे प्रा.किशोर म्हेत्रे, एनएसएस विभागाच्या सदस्या प्रा. रश्मी काजरेकर, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा. डॉ. वालावालकर, प्रा. रमाकांत गावडे, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक बाबासाहेब वाघमारे, समुपदेशक समीर शिर्के, अवंती गवस, प्रथमेश सावंत, भावना साटम, प्रदीप पवार, कुणाल चव्हाण, बाळकृष्ण शेळके व तसेच एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =