शहरातील राडा संस्कृती ठेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..

शहरातील राडा संस्कृती ठेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा इशारा

सावंतवाडी

शहरातील शिल्पग्राम हॉटेलची काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी धिंगाणा घालून तोडफोड केली आहे. या समाजकंटकांवर कारवाई होणे गरजेचे असून, केवळ ते भाजपशी संबंधित असल्याने नगरसेवक उदय नाईक यांनी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालुन अशा लोकांना पाठीशी घालणे ही दुर्दैवीबाब आहे‌. अशी गुंडगिरी शहरात खपवून घेतली जाणार नाही.या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवून त्या संबंधित हॉटेल मालकाच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. तर सुसंस्कृत शहरात राडा संस्कृती डोकं वर काढत असेल तर त्याला ठेचल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील पुंडलिक दळवी यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा