You are currently viewing जात पडताळणी प्रमाणपत्रां संदर्भात आ. वैभव नाईक ओरोस येथे जात पडताळणी कार्यालयात घेणार आढावा

जात पडताळणी प्रमाणपत्रां संदर्भात आ. वैभव नाईक ओरोस येथे जात पडताळणी कार्यालयात घेणार आढावा

प्रमाणपत्रांबाबत अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

विविध अभ्यास क्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यता असते, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होवून हे प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करत आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ओरोस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे गुरुवार ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३ ते ५ वा. पर्यंत आ. वैभव नाईक सिधुदुर्ग समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांच्या कडून जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात आढावा घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रा संबंधित काही अडचणी असतील तर वरील वेळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा