You are currently viewing सावंतवाडीत ३१ ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबर कालावधीत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सावंतवाडीत ३१ ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबर कालावधीत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सावंतवाडी :

 

दिवाळी सुट्टीत सावंतवाडीत प्रथमच एक विशेष उपक्रम आयोजित होत आहे. यात स्वसंरक्षणासाठी सक्षम पिढी घडविणे व त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कलेचा वारसा जिवंत ठेवण्याच्या उदात्त ध्येयाने शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

सदर प्रशिक्षण शिबिर मर्दानी आखाडा, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्र, सैनिक गिरगाव कोल्हापूर या संस्थेच्या सहकार्याने आणि ”अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग” व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. या प्रशिक्षण शिबिराचा कालावधी सोमवार दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ ते ६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत असून प्रशिक्षणार्थीच्या जागा या मर्यादित आहेत. सावंतवाडी येथील कळसूलकर इंग्लिश स्कूलच्या मैदानात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहिती व नावनोंदणी साठी श्री. राजू केळूसकर ७०८३९७४४००, ९४२१०७३३८३ यांच्याशी संपर्क साधावा. दि २६ ऑक्टोंबर २०२२ पर्यत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थीनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 19 =