You are currently viewing शिक्षक आमदार स्व बाबासाहेब सोमवंशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन

शिक्षक आमदार स्व बाबासाहेब सोमवंशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन

अमरावती दि. 15 –

 

अमरावतीच्या भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील श्री भगवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये येत्या मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शिक्षक आमदार स्वर्गीय बाबासाहेब सोमवंशी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .हे व्याख्यान देण्यासाठी सुप्रसिद्ध वक्ते व स्तंभलेखक श्री माधव पांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे .त्यांच्या व्याख्यानाचा विषय ईश्वरनिष्ठांची मांदियाळी हा असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय विद्या मंदिरचे सदस्य व भगवंतराव पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री राजा महाजन हे राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे यांनी केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =