You are currently viewing आंगणेवाडी यात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात..

आंगणेवाडी यात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात..

मालवण / आंगणेवाडी :

 

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव २ मार्च रोजी संपन्न होत आहे. प्रशासनाकडून यात्रेकरू भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल कुठेही कमी राहू नये यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. प्रत्येक विभागाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या उपाय योजनांची माहिती लेखी स्वरूपात महसूल प्रशासनाला द्यावी असे प्रतिपादन प्रांताधिकारी ऐश्वर्या कोळूशे यांनी आंगणेवाडी येथे केले. आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने केलेल्या कामांची माहिती बुधवारी आंगणेवाडी येथे प्रांताधिकारी यांनी घेतली. यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे, मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, बाळा आंगणे, काका आंगणे, बाबू आंगणे यांसह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आज गुरुवारपासून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून बिळवस ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा प्रत्येक घरी नळ योजनेद्वारे पाणी पोहोचेल अशी योजना पूर्णत्वास जात आहे अशी माहिती ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी दिली. भाविकांसाठी स्वच्छता गृहांचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने मंदिर परिसर आणि प्राथमिक शाळा येथे आरोग्य पथक तैनात असणार आहे. अशी माहिती डॉ जाधव यांनी दिली. ग्रामस्थांसाठी चार रुग्णवाहिकांची मागणी यावेळी बाबू आंगणे यांनी केली. छोट्या टँकर द्वारे वाडीत पाणी पुरवठा करण्याची मागणी अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केली. जादा यात्रा स्पेशल रेल्वेच्या वेळे नुसार एसटी उपलब्ध ठेवण्याचे निर्देश प्रांताधिकारी यांनी एसटी प्रशासनाला दिले

बीएसएनएल कडून १ मुख्य टॉवर सोबत आणखी २ छोटे टॉवर कार्यन्वित झाले असून आवश्यक त्या ठिकाणी मागणी नुसार इंटरनेट कनेक्शन बीएसएनएलच्या वतीने देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तलाठी कार्यालय इमारत बांधताना बहुउद्देशीय बांधावी अशी मागणी भास्कर आंगणे यांनी केली. जोड रस्त्यावर दिशादर्शक उभारण्याचे निर्देश प्रांताधिकारी यांनी दिले. आंगणेवाडी ते बिळवस फाटा स्ट्रीट लाईट काम पूर्ण झाल्या बद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी ऍड. दिनेश आंगणे, मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, बाब्या आंगणे, तनुराज आंगणे, गणेश आंगणे, पंकज आंगणे, नंदू आंगणे, सार्व. बांधकाम विभाग अभियंता अजित पाटील, तुषार एरोंडे, सहा बीडीओ मुकेश सजगाणे, ल पा विभागाचे वैभव वाळके, आरोग्य अधिकारी डॉ एस बी जाधव, प्रकाश कात्रे, अभियंता अतुल माने, आरोग्य विभागाचे सूरज बन्सर, बीएसएनएलचे प्रवीण कवाडे, प्रकाश सरगर, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, तलाठी श्री चव्हाण, सहा. पोलीस निरी. संजय आंबेरकर, कैलास ढोले, प्रमोद नाईक, विवेक फरांदे, एसटीचे स्वप्नील कवाडे, आदी उपस्थित होते.

जत्रे साठी व्यापाऱ्यांनी हंगामी वीज जोडणी घेताना सिंगल फेजला ४ हजार, थ्री फेज ला ६ हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. हा दर कमी करावा अशी मागणी बाबू आंगणे यांनी केली. तसेच मागील जत्रेचा परतावा सुद्धा होणे बाकी असल्याने ही रक्कम त्या व्यापाऱ्यांची त्वरित परत मिळावी अशीही मागणी करण्यात आली. जत्रोत्सव संपल्या नंतर सदर रक्कम आंगणेवाडी येथे व्यापाऱ्यांना परत केली जाईल अशी माहिती वीज वितरण कडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + two =