You are currently viewing कणकवली शहरातील २५७ कुत्र्यांवर निर्बीजीकरण, अँटी रॅबीजचे लसीकरण

कणकवली शहरातील २५७ कुत्र्यांवर निर्बीजीकरण, अँटी रॅबीजचे लसीकरण

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली जिल्ह्यातील पहिली मोहीम सत्यात

​कणकवली ​:​ ​​

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात राबविण्यात येणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व अँटी रॅबीज लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत कणकवली शहरातील २५७ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापूर या संस्थेमार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी योजना राबविणा​री कणकवली पहिलीच नगरपंचायत ठरली आहे. ही मोहीम सत्यात उतरल्याने कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. नगराध्यक्ष नलावडे यांच्या संकल्पनेतून पंधरा दिवसांपूर्वी योजना शहरात राबविण्यात आली. जानवली येथे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या जागेत या भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात येत आहे. एकावेळी सुमारे पस्तीस कुत्रे पकडण्यात येत असून, त्यांना तीन दिवस देखरेखीखाली ठेवून पुन्हा पकडलेल्या जागी सोडण्यात येत आहे. यामुळे येत्या काळात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रावापासून कणकवलीकरांची सुटका होणार आहे. कणकवली नगरपंचायतमार्फत नलावडे यांनी तातडीने ही मोहीम हाती घेतली. व त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली. दर तीन दिवसांनी पहाटे ​५.३० वाजल्यापासून या एजन्सीमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे काम हाती घेण्यात येते. गेले पंधरा दिवस सातत्यपूर्ण हे काम सुरू असून या मोहिमेला आता यश मिळू लागले आहे. त्यामुळे कणकवलीवासीयांतून नगराध्यक्षांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =