You are currently viewing वेंगुर्ले-केळूस ग्रामंचायतीच्या सरपंचासह सदस्यांची पदे रद्द करा

वेंगुर्ले-केळूस ग्रामंचायतीच्या सरपंचासह सदस्यांची पदे रद्द करा

उपसरपंच कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वेंगुर्ले

केळूस सरपंच किशोर केळूसकर यांचेसह अन्य ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 14 `ह’ नुसार रद्द करण्याची मागणी केळूस ग्रामपंचायतीचे सदस्य तथा उपरसरपंच कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी सिंधदुर्ग जिल्हाधिकारी यांचेकडे पुरावे जोडून केली आहे. त्यामुळे केळूस ग्रामपंचायतीचे सरपंच पदावर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचेकडे केळूस उपसरपंच यांनी दिलेल्या निवेदनांत केळूस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर कार्यरत असणारे किशोर बापू केळूसकर यांच्या आईच्या म्हणजे शकुंतला बापू केळूसकर यांच्या नावावर असलेले घर क्र. 745 या घराची घराची घरपट्टी कर, दिवाबत्तीकर व आरोग्यकर देयक रक्कम मागणी करीता ग्रामपंचायतीने दि. 20-04-2020 नुसार मागणी केली होती. परंतु निर्धारीत तीन महिन्यांच्या म्हणजेच 90 दिवसांच्या कालावधीत सरपंच किशोर बापू केळूसकर यांचेसह अन्य सदस्यांनी देयक रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा न करता दि. 18-12-2020 म्हणजेच साधारणत: 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीनंतर सदरचा कर भरणा केलेला आहे. याचा पुरावा म्हणून या सोबत ग्रामपंचायत कर, मागणी पावती व कर भरणा केलेल्या पावतीची झेरॉक्स प्रत जोडलेली आहे.

तरी याबाबत आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करून ग्रामपंचायत अधिनियमांनुसार सरपंच किशोर बापू केळूसकर यांचेसह कर भरणा न केलेल्या सदस्यांचे सदस्यपद रद्द करावे अशी मागणी केली आहे.या लेखी निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्ग जिल्हापरीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व वेंगुर्ले तहसिलदार यांना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =