You are currently viewing कळसुली सरपंच सचिन पारधीये यांना पुत्रशोक

कळसुली सरपंच सचिन पारधीये यांना पुत्रशोक

कणकवली :

कणकवली तालुक्यातील कळसुली गावचे सरपंच सचिन पारधीये यांचा दहा वर्षीय मुलगा अभिराज सचिन पारधीये याचे आज दुपारी 12 वा च्या सुमारास आकस्मिक निधन झाले. सचिन पारधीये हे सध्या कणकवली मध्ये राहत असून, आज सकाळी अचानक त्यांच्या मुलाला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला तातडीने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्याचे निधन झाले. अभिराज हा जन्मताच दिव्यांग होता. मात्र आज दुपारी अचानक त्याला त्रास जाणवू लागल्याचे लक्षात येताच तातडीने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. त्याच्या पाश्चात वडील सचिन पारधीये, आई, लहान भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =