You are currently viewing काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे निधन

काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा मुंज यांचे आज निधन झाले. गेले वर्षभर ते आजाराशी झुंज देत होते. गेले काही दिवस ते गोवा बांबुळी येथे ते उपचार घेत होते. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या जाण्याने कुडाळ कॉंग्रेसमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेली तीन दशके घावनाळे दशक्रोशीवर आपल्या कार्य कर्तृत्ववाने एक हाती सत्ता ठेवली होते. आबासाहेब अंत्यदर्शनासाठी 9 ते 10.30 वाजता बागेत ठेवण्यात येईल, यांचा अंत्यविधी आजच सकाळी 10.30 वाजता खोचरेवाडी येतील बागेत होईल असे कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा