You are currently viewing कुडाळ डेपोमध्ये एस टी बसेस नसल्याने वेळापत्रक कोलमडले

कुडाळ डेपोमध्ये एस टी बसेस नसल्याने वेळापत्रक कोलमडले

येत्या दोन दिवसांत एसटी बस सुरळीत सुरु न झाल्यास शिवसेना तिव्र आंदोलन करणार _अतुल बंगे

कुडाळ

कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्ण पणे कोलमडले असल्याने गावा गावात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला कुडाळ डेपो जबाबदारी घेईल का_असा सवाल शिवसेनेचे अतुल बंगे यांनी आज केला

कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी एसटी बस गेले दोन दीवस आली नसल्याने आज कुडाळ आगाराच्या अधिका-यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मी स्वतः, युवासेनेचे राजु गवंडे, नेरूर शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर,साळगाव शिवसेना विभागाचे संदीप कोरगावकर यांच्या समवेत निवेदन देण्यासाठी गंभीर बाब उघड झाली एस टी बसेस ओरोस आर टी ओ कडे पासिंगसाठी उभ्या आहेत,चालक व वाहक बसुन आहेत, अधिकारी हतबल झालेले दीसुन आलेत एसटी गाड्या कुडाळ डेपोमध्ये उपलब्ध नसल्याने लांब पल्ल्याच्या व गावा गावात जाणा-या बसेस रद्द करण्यात आल्याची माहिती उपस्थित अधिका-यांनी दीली असल्याची माहिती श्री बंगे यांनी दिली ,पासिंगच्या नावाखाली आर टी ओ कडे बसेस उभ्या करुन विद्यार्थी व प्रवाशांचे हाल कशासाठी असा प्रश्न श्री बंगे यांनी उपस्थित करुन कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी बस गेले दोन दीवस आली नाही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण?अशा प्रश्नांचा भडीमार करत येत्या दोन दिवसांत एसटी बसेस पुर्ववत सुरु करा अन्यथा शिवसेनेच्यावतीने कोणत्याही क्षणी आंदोलन करु असा इशारा श्री बंगे यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − seven =