You are currently viewing कुडाळ येथील घटना; मित्राच्या निधनाच्या धक्क्याने सुनील चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कुडाळ येथील घटना; मित्राच्या निधनाच्या धक्क्याने सुनील चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गणेश विसर्जनाच्या अकराव्या दिवशी भंगसाळ नदीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या दत्ताराम बेंद्रे यांचा मित्र सुनिल जगन्नाथ चव्हाण (रा.मुंबई-माहीम) यांचे कुडाळ येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले एका पाठोपाठ एक मित्र गेल्याने अभय राऊळ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुडाळ भैरववाडी येथील अभय गणपत राऊळ हे मुंबईला असतात गणेश उत्सवाला ते आपल्या कुडाळ येथील घरी येतात आणि गणेश विसर्जनावेळी मुंबई येथील त्यांचे मित्र दरवर्षी याठिकाणी येतात. दत्ताराम बेंद्रे, सुनील चव्हाण, श्री. कल्याणकर हे मित्र गणेश विसर्जनासाठी कुडाळ येथे आले होते गणेश विसर्जनाच्या अकराव्या दिवशी कुडाळ घनसाळ नदी येते गणेश विसर्जन झाल्यावर दत्ताराम बेंद्रे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता मित्राच्या या निधनाचा धक्का सर्वांनीच घेतला दरम्यान सोमवार २० सप्टेंबर ते आज मंगळवार २१ सप्टेंबर पर्यंत मृत दत्ताराम बेंद्रे यांच्या संदर्भातील प्रक्रिया सुरू होती या प्रक्रियेत सुनील चव्हाण हे सुद्धा होते मित्राच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला असताना आज (मंगळवार) दुपारी सुनिल चव्हाण यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तात्काळ त्यांचे मित्र श्री कल्याणकर यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यात त्यांचे निधन झाले. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा