You are currently viewing आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा उद्या जत्रोत्सव…

आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा उद्या जत्रोत्सव…

आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा उद्या जत्रोत्सव…

कणकवली

तालुक्यातील आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा उद्या १८ जानेवारीला जत्रोत्सव होणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुवा अभिषेक शिरसाठ यांचे सुस्वर संगीत भजन व आंब्रड येथील देवी भगवती ढोल पथकाचे “ढोल वादन” खास आकर्षण असणार आहे.

या जत्रोत्सवाच्या निमित्ताने १८ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता नित्यपूजा, १० वाजल्यापासून दर्शन व माहेरवाशीण ओटी भरण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, रात्री ८ वाजता शआनंद मारुती बाणे यांचा गायनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता कोटेश्वर प्रसादिक भजन मंडळ हरकुळ खुर्द बुवा बुवा श्री. अभिषेक शिरसाट यांचे सुस्वर संगीत भजन, श्री देवी भगवती ढोल पथक आंब्रड यांचे ढोल वादन, रात्री १० वाजता श्री पावणादेवी प्रासादिक दिंडी भजन, किंजवडे (परबवाडी) यांचे भजन, १२.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचे महान पौराणिक नाटक – धारातीर्थक्षेत्र होणार आहे. तरी भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गांगो-भैरी देवस्थान समिती आशिये यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा