You are currently viewing जांभवडे-बामणवाडी श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

जांभवडे-बामणवाडी श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

इयत्ता दहावी, बारावी,तसेच पदवी परिक्षेत उज्ज्वल यश संपादीत केलेल्या एकूण सोळा गुणवंत विद्यार्थ्यांचा जांभवडे-बामणवाडी ता.कुडाळ येथील श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ ह्या ट्रस्टच्या वतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

दरवर्षी ट्रस्टच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांचा सन्मान करतांनाच इतर मुलांना प्रोत्साहन मिळावे व सर्व मुलांनी उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती करावी यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.

या कार्यक्रमामध्ये मंडळाचे अध्यक्ष संजय तर्फे, सचिव मुख्याध्यापक वामन तर्फे, सहसचिव मोहन कदम, कार्यकारिणी सदस्य सखाराम सुर्वे, अविनाश तर्फे, औदुंबर तर्फे, अरुण सावंत, मोहन तर्फे, वैभव तर्फे, शैलेश तर्फे, अभिषेक पालव, चंद्रशेखर राणे, सिद्धेश भोगले, महेश तर्फे, बाळा मडव, रामचंद्र सावंत, संतोष कदम,व सर्व सदस्य, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मुख्याध्यापक, सचिव वामन तर्फे यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा