You are currently viewing माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती रा. काँ. कणकवली कार्यालयात साजरी…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती रा. काँ. कणकवली कार्यालयात साजरी…

कणकवली

भारताचे भूतपूर्व पंतप्रधान काँग्रेसचे नेते स्वर्गीय राजीव गांधी यांनी खऱ्या अर्थाने संगणक क्रांती ला सुरुवात केली आणि आज सर्वच क्षेत्रात डिजिटल प्रणाली कार्यरत आहे याचे श्रेय राजीव गांधी यांचेच आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती राष्ट्रीय काँग्रेस कणकवली तालुका कार्यालयात साजरी करण्यात आली या वेळी जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते नादिरशहा पटेल ह्यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थितांनी आदरांजली वाहिली.

यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, प्रविण वरूणकर, संतोष टक्के, प्रदीपकुमार जाधव, प्रदीप तळगावकर, सचिन सावंत, राजेंद्र पेडणेकर , संतोष तेली, पंढरी पांगम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा