You are currently viewing हे देवा ……

हे देवा ……

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

हे देवा ……

हे देवा ….

हे देवा तुला सांगू का ..
मी नाही रे नाही रे तुका …
नाही ज्ञानेश्वर , नाही एकनाथ …
मी आहे रे … लोभी पक्का …..

मला आवडते रे सारे , मला घरदार वाटे प्यारे
सुख आवडते ,दु:ख नावडते .. यात सांग रे
काय चुका ….

जन्म दिलास तू आम्हाला ,जोडीला ते वैभव सारे
उपभोगतो रे , आनंद मानतो ..
सांग राहू कसा मी मुका …..

तुला स्मरतो रे रोज आम्ही..कामावर जातो नेहमी
पोटपाणी आहे, आहे रोज काम …
पात्र नाही का रे कौतुका ….

नाही संसार त्यागणारं.. रोज नाम ही रे घेणार
प्रिय आहे मला .. हे जग सारे ….
का रे त्याग करू मी फुका ….

नाही विरक्तीची गरज ..कर्म करावे छान रोज
तुला अर्पावे ते .. तूच सांगितले …
होता संसारी पहा तुका …

तुझ्यावर ठेवूनी भार ..बघ करणार रे संसार
तुझे घेऊ नाम .. तुझे करू काम…
तुम्ही रागावू फक्त नका ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =