You are currently viewing भावुक भावरंग

भावुक भावरंग

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भावुक भावरंग*

~~~~~~~~~~

मीच माघारी पहाता वळूनी

वाटे आज किती दूर आलो

 

आठव सारे मनी रेंगाळलेले

उसवता कासावीस जाहलो

 

आताशा मजला सराव झाला

वास्तवास मी समजूनी गेलो

 

जे घडायचे ते ते घडूनी गेले

एकांती निःशब्द जगू लागलो

 

शब्दप्रीतीचे भावरंग भावुक

मी आभाळी रंगवित राहिलो

 

अजरामर पावनी भावप्रीती

या जन्मात अनुभवत राहिलो

~~~~~~~~~~~~~~~

*©️विगसातपुते*

प्रतिक्रिया व्यक्त करा