You are currently viewing भटक्या विमुक्त जाती-जमाती बांधवांना शासकीय मदत मिळावी असे निवेदन

भटक्या विमुक्त जाती-जमाती बांधवांना शासकीय मदत मिळावी असे निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष अशोक पवार व्हि.जे.एन. टी.सेल सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वा खाली आज कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

सध्या सर्व देशभरात कोरोना सारखे महामार्गाचे संकट आहे अशा परिस्थितीमुळे पूर्ण देश आर्थिक संकटात आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत बंद आहेत त्यामुळे भटक्या विमुक्त जाती-जमातीचे बांधव व भगिनी यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, कारण आमचा समाज हा रोजंदारीवर जगणारा आहे सध्या सिमेंट स्टील खडी वाळू यांचे दर वाढलेले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील कामे बंद असल्याने सध्या काम मिळणे कठीण झाले आहे इतर समाज व्यापारी वर्ग जसा अडचणीत आहे तसेच आमचे बांधव व भगिनी देखील खूप अडचणीत आहे कोरूना सारख्या महामारी मुळे त्यांना रोजगार म्हणजे मजुरी देखील मिळत नाही करण्याच्या भीतीमुळे कोणीही काम देत नाही आमच्या समाज बांधवांच्या व भगिनींच्या व्यथा शासन दरबारी मांडाव्यात व आमच्या समाजाला आर्थिक सहाय्य मिळावे जेणेकरून समाजातील लोकांना कुटुंब चालविताना मुलांना शिक्षण देताना थोडेफार सहाय्य होईल एवढेच.

अश्या प्रकारचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या कडून कलेक्टर मॅडम यांना देण्यात आले. जिल्हा सरचिटणीस सुरेश वडार, कुडाळ तालुका अध्यक्ष गिरिश नामदेव मोहिते, ॲड. आरती अशोक पवार, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोडिंबा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विजय सोमलू राठोठ,साईल सुनील पवार, आदीत्य अशोक पवार, आदर्श अशोक पवार, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − two =