You are currently viewing पणदुर सिद्धवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरला जीवनदान

पणदुर सिद्धवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरला जीवनदान

 

 

कुडाळ :

 

आज पणदूर येथील सिद्धवाडी येथील मदन शिरोडकर यांच्या घरानजीक संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये एक वयस्कर नर जातीचे खवले मांजर अडकल्याचे शिरोडकर गुरुजी यांच्या लक्ष्यात आले. त्यानी सरपंच दादा साईल यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर सरपंच दादा साईल यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करत या खवले मांजराला सुरक्षितरित्या जाळ्यातून बाहेर काढून वन विभागाच्या सल्ल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेत नैसर्गिक अधिवासात सोडले.

 

 

या खवले मांजराला बघण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. खवले मांजर हा अतिशय दुर्मिळ असणारा प्राणी आहे. याच्या खवल्यांचा औषधी उपयोग असल्याने त्याची सिंधुदुर्गातून फार मोठी तस्करी होत आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी वनविभागामार्फत नेहमी प्रयत्न चालू असतात.

आज चुकून जाळ्यात सापडलेल्या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सरपंच दादा साईल यांच्या बरोबर स्थानिक ग्रामस्थ शिरोडकर गुरुजी, चंद्रकांत साईल, पोलीस पाटील देऊ सावंत, नागेश कुबल, राकेश सावंत, विनायक साईल यांनी मदत केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी पिळणकर साहेब, सिद्धार्थ शिंदे आणि नकाशे आदी उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा