You are currently viewing परी

परी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची काव्यरचना

उगा नाचतो
बोचरा वारा
उडवी धुळ
अश्रूच्या धारा

तापले उन्हं
पसरे तोंड
उन्हझळ त्या
फसते खोंड

सुकले पान
वाजत राहे
वा-याचा मार
साहत राहे

निजले बाळ
झोळीत हले
सुरवंटे ते
चावते भले

कामात भिजे
फाटकी बंडी
कुजले कांदे
हसते मंडी

बाजार सजे
चमक्या जरी
उपाशी रडी
नाजुक परी

ढेकर देत
फिरतो नाग
कळी थरारे
गुलाब बाग

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + fourteen =