You are currently viewing वेंगुर्ला येथे फ्लॉवर फेस्टिव्हल या ऑनलाईन कोर्सचा शुभारंभ

वेंगुर्ला येथे फ्लॉवर फेस्टिव्हल या ऑनलाईन कोर्सचा शुभारंभ

वेंगुर्ला

बॅ.खर्डेकर महाविद्यालय-वेंगुर्ला, इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन-कोल्हापूर शाखा, गार्डन्स क्लब कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिव्हल‘ ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचा शुभारंभ भौतिकशास्र विभाग प्रमुख डी.बी.राणे यांच्या हस्ते करण्यात आला. जैव विविधतेने संपन्न पश्चिम घाटातील सपुष्प वनस्पतींविषयी समजून घेऊन त्यांचा उपयोग शाश्वत विकासासाठी करणे व पुष्परचना शास्त्रोक्त पध्दतीने शिकणे हा या कोर्सचा उद्देश आहे.

यावेळी नितीन कवठणकर याने ‘‘माटी‘‘ ह्या विषयावर प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर शेखर मोहिते यांनी सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठाराविषयी माहिती दिली. तसेच शैला निकम यांनी पुष्परचना कशी करावी ह्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.धनश्री पाटिल यांनी कोकणातील पारंपारिक फुलांच्या व फळांच्या मदतीने पुष्परचना कशा साकारल्या जाऊ शकतील ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनिती देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात सहभागी झालेल्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रितीश लाड, अॅलिस्टर फर्नांडिस, प्रथमेश गावडे, निकीता निनावे, करिश्मा मोहिते, हिरोजी परब व संतोषी आमडोसकर आदी उपस्थित होते. आभार रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्ष साहिली निनावे हिने मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा