शिरोडा येथे जागा बदलत बसते अंदर बाहर जुगाराची मैफिल

शिरोडा येथे जागा बदलत बसते अंदर बाहर जुगाराची मैफिल

जिल्ह्यात सध्याच्या घडीला जर कुठचे धंदे आघाडीवर असतील तर ते गैरधंदे. मटका, दारू, जुगार या धंद्यांना कोरोनाच्या काळात उत आला असून त्यांना खाकीचा वरदहस्त लाभत असल्याने अगदी बिनधास्तपणे गैरधंदे सुरू आहेत.
शिरोडा येथे रोज जागा बदलून अंदर बाहर जुगार सुरू आहेत, आणि यात महत्वाचे म्हणजे नाईकी करणाऱ्या एका कधीही पराजय न झालेल्या खाकी वर्दीवाल्याचा वरदहस्त आहे. याच्या आशीर्वादानेच शिरोडा येथे बंटी आणि बबली फेम, दत्ताचा नैवेध, आणि मित नसलेला सुमित हे तिघे मिळून ही अंदर बाहर जुगाराची मैफिल चालवतात.
एकीकडे कोरोनाचे तांडव, रोज वाढणारी रुग्णसंख्या, मृत्युदर यात जुगाराच्या बैठकीना खाकीचा आशीर्वाद म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी अशीच परिस्थिती आहे. रस्त्यावर घोळका दिसला तर दंड आणि दंडुके, परंतु जुगाराच्या बैठकांना हात ओले होत असल्याने आशीर्वाद अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील खाकीचा हा गोंधळ संपणार कधी?

प्रतिक्रिया व्यक्त करा