You are currently viewing विनापरवाना साग लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वनविभागाकडून ताब्यात…

विनापरवाना साग लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वनविभागाकडून ताब्यात…

विनापरवाना साग लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वनविभागाकडून ताब्यात…

कणकवली

साळशी देवगड येथे विनापरवाना साग लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वनविभागाने ताब्यात घेतला. या प्रकरणी सागवान लाकूड वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच टेम्पो आणि सागवानी लाकूड जप्त करण्यात आले आहे.सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवा किशोर रेड्डी उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक आप्पासो राठोड वनरक्षक, रामदास घुगे यांनी ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेला बोलेरो पिक अप आणि सागवानी लाकूड फोंडा विक्री आगर येथे संरक्षणासाठी ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाकडूनदेण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा