You are currently viewing एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासाठीचे आंदोलन योग्यच – राजन तेली

एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासाठीचे आंदोलन योग्यच – राजन तेली

शासनाच्या दबावाला बळी पडू नका, सावंतवाडीत आंदोलनकर्त्यांची घेतली भेट…

सावंतवाडी

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणी सुरू असलेले कर्मचाऱ्यांचे उपोषण योग्यच आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळेपर्यंत भाजपा त्यांच्या सोबत राहिली, असा शब्द भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिला. दरम्यान शासनाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता, हे आंदोलन सुरु राहू द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी चौथ्या दिवशीही कायम असलेल्या येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला श्री.तेली यांनी भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, सुधीर आरिवडेकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, अमित परब, मनोज नाईक, बंटी राजपुरोहित, सत्या बांदेकर, गुरू सावंत, विनोद सावंत, अजय सावंत आदी उपस्थितीत होते.

ते पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणासाठीची मागणी योग्यच आहे. त्यांना शासनाच्या सर्व सुविधा या मिळाल्याच पाहिजेत. त्यांच्या कुटुंबावर सुद्धा वेगवेगळे प्रसंग ओढवत असतात, त्यामुळे त्यांची ही मागणी योग्य आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, राज्यात या आंदोलनाला १४ दिवस उलटूनही सरकार निर्णय घेत नाही. ही शासनाची दडपशाही आहे. त्यामुळे याबाबत निर्णय झाल्याशिवाय तुम्ही माघार घेऊ नका, सरकारने तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तुम्ही घाबरून जाऊ नका, आम्ही भाजप म्हणून न्याय मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 12 =