You are currently viewing वेंगुर्ले कृषी कार्यालयासमोरील उपोषण तात्पुरते स्थगित

वेंगुर्ले कृषी कार्यालयासमोरील उपोषण तात्पुरते स्थगित

वेंगुर्ले कृषी कार्यालयासमोरील उपोषण तात्पुरते स्थगित

पीक विमा नुकसान भरपाई ४ दिवसात न मिळाल्यास पुन्हा १० नोव्हेंबर पासून तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

वेंगुर्ले

फळ पिक विमा योजने अंतर्गत भरपाई मिळाली नसल्याने वेंगुर्लेतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयासमोर पुकारलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र येत्या ४ दिवसात भरपाई न मिळाल्यास पुन्हा १० नोव्हेंबर पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसात देय भरपाई मिळणे अपेक्षित आहे. परंतु अद्यापही देय भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या मागण्यांबाबत उचीत कार्यवाहीस विनंती आहे. याबाबत शेतकऱ्यांकडुन वारंवार पाठपुरावा सुरु होता. मात्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज वेंगुर्लेतील शेतकरी संघाचे श्यामसुंदर राय, यशवंत सावंत, प्रदीप सावंत, संदीप नाईक, दिगंबर शेटकर, सुरेश नाईक, सुभाष परब, विजय सरमळकर आदी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयासमोर सकाळपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला अजित पवार गटाचे एम. के. गावडे तसेच भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी भेट देऊन माहिती घेतली.
आपल्या मागण्या शासनामार्फत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर येत्या ४ दिवसात नुकसान भरपाई मिळावी, असे सांगून शेतकऱ्यांनी आजचे उपोषण स्थगित केले. मात्र नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांच्या वतीने श्यामसुंदर राय यांनी दिला आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 5 =