You are currently viewing जिल्हा परीषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकियेबाबत प्रश्न

जिल्हा परीषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकियेबाबत प्रश्न

गेली अनेक वर्षे सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हयातील शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. परंतु गेल्यावर्षी ही परंपरा खंडीत करून जिल्हा परिषदेने शिक्षकांना पुरस्कारापासून वंचित ठेवले होते या विरूद्ध शिक्षक संघटना शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर तत्कालीन जि. प. अध्यक्षा यांनी सर्व प्राप्त झालेले प्रस्ताव अपात्र असल्यामुळे शिक्षकांना पुरस्कार देता येणार नाही असे सांगितले होते.

यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार देताना गेल्यावर्षी ज्या शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले होते त्यातील दोन शिक्षकांना पुरस्कार दिल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कारासाठी अपात्र असलेल्या शिक्षकांनी यावर्षी असे विशेष कोणते कार्य केले त्यामुळे गेल्यावर्षी अपात्र शिक्षक पात्र झाले आहेत हा प्रश्न प्रदीप नारकर यांनी उपस्थित केला आहे. शिक्षणासारख्या पवित्र व जिल्हयातील मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे संशयास्पद परिस्थिती निर्माण होणे, जिल्हयाच्या शैक्षणिक विकासासाठी अयोग्य आहे. शेक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अनेक शिक्षक चांगल्याप्रकारे काम करत आहेत, तसेच प्रसिद्धीपासूनही दूर असतात. अशा पुरस्कार निवड पद्धतीमुळे त्या शिक्षकांवर अन्याय होऊन ते पुरस्कारापासुन वंचित राहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने स्वत: आपल्या सर्व शिक्षकांचे मूल्यमापन करून पुरस्कार देणे आवश्यक आहे.

सिंधुदूर्ग जिल्हयामध्ये बहुसंख्येने असलेला आपला शेतकरी बांधव व त्यांचा प्रमुख व्यवसाय असलेला आपला जिल्हयातील शेती उद्योग यासाठी मार्गदर्शक ठरणारे कृषी व पशुपक्षी प्रदर्शन या जिल्हा परिषदेला गेली तीन वर्षे करता आले नाही. राज्य शासनाकडून जिल्हयातील विकास कामांसाठी मिळणारा निधी ही जिल्हा परिषद खर्च करू शकत नाही. त्यामुळे गेली तीन वर्षे सातत्याने हा विकास निधी अखर्चित राहिल्यामुळे शासनास परत करावा लागत आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद अधिनियमाची पायमल्ली करून विकास निधी चुकीच्या पद्धतीने वाटप केला जात आहे तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान. कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केलेला आहे. शिक्षण विभागामध्ये एल. ई. डी टिव्ही खरेदी प्रकरण, वॉटर प्युरिफायर खरेदी गैरव्यवहार व आता या शिक्षक पुरस्कारांमध्ये गेल्यावर्षी अपात्र ठरलेले शिक्षक यावर्षी पात्र हे सर्व संशयास्पद आहे त्यामुळे सर्वच स्तरावर ही जिल्हा परिषद विफल ठरताना दिसत आहे. असे प्रदीप नारकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 10 =