You are currently viewing वीज कनेक्शन गणेश चतुर्थीच्या कालावधीत तोडू नका

वीज कनेक्शन गणेश चतुर्थीच्या कालावधीत तोडू नका

*पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे महावितरण अधिकाऱ्यांना आदेश*

*आ. वैभव नाईक यांची मागणी*

कोविड काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे अगोदरच नागरिकांवर आर्थिक संकट आहे. त्याचबरोबर गणेश चतुर्थी सणात नागरिकांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे जर कोणाची वीज बिले थकीत असतील तर गणेश चतुर्थीच्या कालावधीत त्या नागरीकांची वीज कनेक्शने तोडू नये अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेऊन ना. उदय सामंत यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करून गणेश चतुर्थीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची वीज कनेक्शने तोडू नका असे कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा