You are currently viewing उपक्रमशील शिक्षक महादेव असरोंडकर राज्यस्तरीय “शिक्षण रत्न” पुरस्काराने सन्मानित!

उपक्रमशील शिक्षक महादेव असरोंडकर राज्यस्तरीय “शिक्षण रत्न” पुरस्काराने सन्मानित!

मदत सामाजिक संस्था नागपूर यांच्याकडून १२ डिसेंबर रोजी होणार वितरण

नागपूर येथील मदत सामाजिक संस्था यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार” मालवण तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठणचे उपक्रमशिल पदवीधर शिक्षक श्री.महादेव आप्पा असरोंडकर यांना जाहीर झाला आहे.श्री.असरोंडकर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन कोणत्याही प्रस्तावाशिवाय त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी होणार्‍या १९ व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री.असरोंडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा