You are currently viewing कणकवलीत शिक्षिकेला ३८ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा

कणकवलीत शिक्षिकेला ३८ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा

कणकवलीत शिक्षिकेला ३८ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा

कणकवली

वाढदिवसाचे गिफ्ट पाठविल्‍याचे सांगून कलमठ येथील एका शिक्षिकेला ३८ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. ९ ते २३ ऑक्‍टोबर या दरम्‍यान टप्पाटप्प्याने ही रक्‍कम त्‍या शिक्षिकेने इंग्लंडमधील दोघा आरोपींच्या बँक खात्‍यावर पाठवली आहे. या प्रकरणी आज कणकवली पोलिसांत ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्‍यानुसार कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

कलमठ येथील त्‍या शिक्षिकेला गणेशोत्‍सव कालावधीत ख्रिस अँड्रीज नावाच्या व्यक्‍तीने व्हॉट्‌सॲप नंबरवर ‘हाय’ असा मेसेज पाठवला होता. त्‍याला त्‍या शिक्षिकेने रिप्लाय दिला. त्‍यानंतर महिनाभर ख्रिस अँड्रीज आणि त्‍या शिक्षिकेच्या व्हॉटस्‌ॲपवर चॅटिंग सुरू होते. ख्रिस अँड्रीज या व्यक्‍तीने ऑक्‍टोबर महिन्यात आपला वाढदिवस आहे. त्‍यानिमित्ताने मी सर्व मित्रांना ५० हजार पाऊंड कॅश असलेले बर्थ डे गिफ्ट पाठवले आहे. तुम्‍हालाही पाठवणार आहे. तुमचा पत्ता द्या असे ख्रिस अँड्रीज याने त्‍या शिक्षिकेला सांगितले. सुरवातीला त्‍या शिक्षिकेने गिफ्ट नको असे सांगितले. नंतर खूप आग्रह झाल्‍यानंतर त्‍या शिक्षिकेने आपला पत्ता ख्रिस अँड्रीज याला दिला आणि लवकरच गिफ्ट तुमच्या घरी पोचेल असे सांगितले.

दरम्‍यन ९ ऑक्‍टोबर रोजी त्‍या शिक्षिकेला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन उचलल्यानंतर सुनीती नावाच्या महिलेने हिंदी भाषेतून संभाषण केले. यात सुनीती हिने, आपण कस्टम कार्यालयातून बोलत आहोत. तुमच्या नावे लंडन येथून ख्रिस अँड्रीज या व्यक्‍तीने गिफ्ट पाठवले आहे. ते गिफ्ट स्कॅन केले असता त्‍यामध्ये ५० हजार पाऊंड ही विदेशी करन्सी आढळून आहे. विदेशातून बेकायदा करन्सी मागविल्‍या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु आपण हे प्रकरण मिटवतो तसेच गिफ्टमधील करन्सीही तुम्‍हाला मिळवून देऊ, त्‍या बदल्‍यात ५ लाख रूपये कस्टम ड्युटी व इतर टॅक्‍स पेमेंट करावे लागले असे सांगितले. यानंतर घाबरलेल्‍या त्‍या शिक्षिकेने, सुनीती नावाच्या महिलेने पाठविलेल्‍या अकाऊंटवर सुरवातीला २ लाख आणि त्‍यानंतर ३ लाख रूपये पाठवले. त्‍यानंतर विविध कर आणि इतर शासकीय फी साठी ९ लाख ३ हजार ५००, त्‍यानंतर पुन्हा १२ लाख ३ हजार ५००, त्‍यानंतर पुन्हा १० लाख ५० हजार अशी एकूण ३८ लाख ३ हजार ५०० रूपयांची रक्‍कम पाठवली.
एकूण ३८ लाख ३ हजार ५०० रूपये पाठविल्‍यानंतर देखील पुन्हा १५ लाख रूपयांची मागणी झाली, त्‍यामुळे ख्रिस अँड्रीज आणि सुनीती या दोहोंकडून आपली फसवणूक होत असल्‍याचे त्‍या शिक्षिकेच्या लक्षात आले. त्‍यामुळे आज त्‍या शिक्षिकेने कणकवली पोलीस ठाण्यात येऊन आपली ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाल्‍याची तक्रार दिली. त्‍या महिलेच्या तक्रारीवरुन कणकवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्‍याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा