राधा प्रेम

दहिदूध मटकी
फोडीतसे कान्हा
नटखट तो
बाळ तान्हा
कन्हैया
नन्हा
रे

गोपिकां संगे खेळे
गोप वृंदावनी
छेडता राधे
सुख मनी
नयनी
पाणी
ते

वाजवितो मुरली
गोधन भोवती
व्याकूळ राधा
सांगू किती
आतुर
होती
रे

अष्टनायिकांचा पती
राधा प्रित न्ह्यारी
तोडी मुरली
प्राण प्यारी
विरह
भारी
रे

(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा