*ज्येष्ठ साहित्यिका समाजसेविका, पर्यावरणप्रेमी, आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*…….देव*
इथे तिथे देव आहे
देव नाही कोठे
देव आहे दगडात
डोंगरात भेटे
देव नांदे घरी दारी
शरीरात राहे
पाणी होऊन निर्मळ
नदीतून वाहे
देव लहानात आहे
मोठ्यातही आहे
देव मातीत उगवे
नभातून पाहे
कणाकणात नांदतो
श्वासात राहतो
मनामनात भिनतॊ
रक्तात वाहतो
अनुपमा जाधव, डहाणू
