You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील दत्तक घेतलेल्या  मुलांना सामाजिक ट्रस्टच्यावतीने आर्थिक मदत

वैभववाडी तालुक्यातील दत्तक घेतलेल्या  मुलांना सामाजिक ट्रस्टच्यावतीने आर्थिक मदत

सडूरे तांबळघाटी येथील चार तर उंबर्डे येथील एक जण असे एकूण पाच विद्यार्थ्यांचा आहे समावेश

आर्थिक मदत दिल्याबद्दल ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी मानले आभार

वैभववाडी

गेल्यावर्षी वैभववाडी तालुक्यातील सडूरे तांबळघाटी येथील कै. शिवाजी बाळकृष्ण बोडेकर यांच्या दोन मुली व दोन मुलगे व उंबर्डे गावातील अक्षय बळीराम शेळके अश्या एकूण पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबतीत दत्तक घेण्याची घोषणा ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली होती.
या घोषणेची अंमलबजावणी वैभववाडी येथील कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आली असून या पाचही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करण्यात आले. या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व अहिल्यादेवी शैक्षणिक,सामाजिक ट्रस्ट च्या वतीने ही मदत देण्यात आली आहे.त्यांना ट्रस्ट कडून रकमेचा धनादेश देण्यात आला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे यांनी ही मदत या विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली. ही मदत दिल्याबद्दल ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचे आभार मानले. तर मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे आभार मानत महासंघाच्या कार्याला शुभेच्छा देत पुढील येणाऱ्या काळात महासंघाला पाठबळ देण्याचे सांगत पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संदीप जंगले सिंधुदुर्ग जिल्हा युवा उपाध्यक्ष नवनाथ झोरे, युवा सरचिटणीस ॲड विक्रमसिंह काळे, वैभववाडी तालुका अध्यक्ष दाजी बर्गे, सल्लागार गंगाराम शिंदे, समाज नेते पत्रकार संजय शेळके, वैभववाडी तालुका धनगर समाज माजी अध्यक्ष सूर्यकांत बोडके, सचिव चंद्रकांत बोडेकर, युवा अध्यक्ष अनिल कोकरे, युवा सचिव अक्षय शेळके, जिल्हा कार्यकारणी सदस्य जयेश शेळके, जिल्हा प्रमुख संघटक निकेश झोरे, जिल्हा युवा कार्यकारणी सदस्य दीपक झोरे, तालुका कार्याध्यक्ष स्वप्निल बावधने, देवगड तालुका अध्यक्ष सुनील खरात, विलास फाले हेमंत फाले, प्रफुल्ल शेळके विजय आप्पाजी बोडेकर, श्रीमती शुभांगी बोडेकर, प्रकाश शेळके, विठ्ठल शेळके, साहिल शेळके, रामचंद्र बावदाने, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + four =