You are currently viewing २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर वायंगणी येथे श्री दत्त जयंती उत्सव

२४ डिसेंबर ते २६ डिसेंबर वायंगणी येथे श्री दत्त जयंती उत्सव

उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या हस्ते दत्त मंदिराचे कलशपूजन; श्री. रामदास प्रभू यांच्या हस्ते कलशारोहण

 

मसुरे :

वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी, होमहवन, कलशारोहण दत्तयाग आणि श्री दत्त जयंती उत्सव २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. यावेळी उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या हस्ते कलश पूजन केले जाणार आहे. तर कलशारोहण श्री. रामदास प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. या उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री दत्त आणि श्री संत दादा महाराज समाधीची नित्यपूजन, ९ वाजता होमहवन, धार्मिक विधी व कलश पूजन, दुपारी १२ वाजता श्री दत्त मंदिर कलशारोहण, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री संत दादा महाराज दिनदर्शिका प्रकाशन, श्री. सिताराम करमरकर यांच्या हस्ते श्री संत दादा महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत भक्ती लिलामृत भाग १,२,३ कादंबरी कल्याण कटोरा व आरती संग्रह या पुस्तकांचे मोफत वाटप, श्री. मनिष साळगावकर यांचा सत्कार सोहळा, रात्री ७ वाजता भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री गुरुदेव दत्ताची आणि श्री संत दादा महाराज यांच्या समाधीची नित्यपूजन, १० वाजता दत्तयाग, भजन, आरती, धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता स्थानिक भजने होणार असून मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नित्यपूजा धार्मिक कार्यक्रम, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता भिक्षाफेरी, १० वाजता गादीवर भिक्षा घेणे, १०:३० वाजता कीर्तन, १२ वाजता दत्त जन्म, रात्री १ वाजता पालखी अशाप्रकारे तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी या कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन घाडीवाडी मित्रमंडळ वायंगणी व ओमसाई भजन मंडळ वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा