You are currently viewing अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ने केली गोरगरीब विद्यार्थांना शैक्षणिक मदत 

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ने केली गोरगरीब विद्यार्थांना शैक्षणिक मदत 

कोरोना च्या महामारी संकटामुळे व अतिवृष्टीमुळे दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब विद्यार्थी यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुंभारमाठ धनगरवाडा,कातवड धनगरवाडी,देवली धनगरवाडी,असरोडी धनगरवाडा,,,कुडाळ तालुक्यातील गोठोस धनगरवाडा गावराई धनगरवाडा, यादोनही तालुक्यातील एकुण १६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रविण काकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इडिया धनगर समाज महासंघ म्हणाले की अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ने गेल्या वर्षीच २२९३ विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावर्षी २०२१ ला ३००० विद्यार्थी ना जंगलातील व डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब यांना मदत करून कायमस्वरुपी शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे टप्या टप्प्याने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे रत्नागिरीत चिपळूण येथे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागातील मुलांना,२३८ मदत केली,सातारा जिल्ह्यातील जावली महाबळेश्वर पाटण तालुक्यातील एकुण ८७ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व कोल्हापूर जिल्ह्य़ातील शाहुवाडी तालुका,आणि पन्हाळा तालुक्यातील एकुण ७६ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असे एकुण ५६६ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून पुढील टप्प्यात साहित्य वाटप करण्यात येणार असून यापसंगी प्रविण काकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ,नवलराज काळे कोकण प्रदेश अध्यक्ष अमोल जंगले जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग नवनाथ झोरे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष बापू वरक कुडाळ तालुकाध्यक्ष मंगेश झोरे मालवण तालुकाध्यक्ष दिपक खरात अध्यक्ष मतदारसंघ सोमनाथ झोरे उपाध्यक्ष निकेश झोरे हेमंत फाले विकास शिदे रोहित वरक ओमकार डोईफोडे जाऊ जंगले . संदेश वरक. संदेश कोकरे. बाबुराव कोकरे. अमोल कोकरे. सागर कोकरे. आदी समाज बांधव उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा