*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भावनांचे पुस्तक…!*
भावनांचे पुस्तक
प्रत्येकाचे निराळे असते
कळण्यासारखे नसते
कोणाला…
जीवन जगताना
कैक अनुभव येतात
वेदनाही होतात
सुखाला…
संकटांच्या पेरणीने
तण दु:खांचे जळतात
भावना कळतात
मनाला…
सुख अज्ञानात
वर्मी घाव ज्ञानाचे
आरोप त्याचे
सोवळेसे…
भावनांचे पुस्तक
वाचून नाही समजत
दिलासे देत
राहते..!
कळते पापणीलाही
संग होता यातनांचे
रक्तबंबाळ शब्दांचे
धडेही…!
तरीही आवश्यक
भावनांचे पुस्तक जीवनास
ध्येय मिळण्यास
जगण्याचे…!
सौ. प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
‘अंतरीच्या खोल डोही’ तून…
