You are currently viewing हूरहूर

हूरहूर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण यांची काव्यरचना*

उमलत्या कळीचे फुल जाहले आज.,
काय सांगू कसे सांगू मला वाटते लाज…।

भिरभिरणारी नज़र माझी ऐसी स्थिर झाली.,
गालावरती अलगद लाली माझ्या आली…।

ओठी येऊ लागले नकळत प्रेमतराणे.,
अंग अंग शहारते जणू लाजाळूची पाने..।

येऊ लागला सुंदर राजकुमार स्वप्नात.,
धडधड होऊ लागली एकाएकी ह्रदयात..।

शांत सागरी फेसाळून उसळल्या लाटा.,
फुलासारखा भासतो मजला आता काटा..।

प्रतिक्षा कराया लागले मन माझे द्वाड.,
लपून बसला कुणीतरी पापण्यांच्या आड..।

चालतांना पाऊल माझे का अवघडते.,
किती ओढते मागे तरी पुढे पुढेच पडते..।

प्रेमाची ही किमया मी झाली लज्जेने चूर.,
उगीच का जाणवते आहे मनी एक हूरहूर…।

 

✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो. 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा