You are currently viewing यशाहूनीही प्रयत्न सुंदर

यशाहूनीही प्रयत्न सुंदर

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची जेष्ठोत्सव, पुणे मधील द्वितीय क्रमांक प्राप्त काव्यपूर्ती रचना.

रमत गमत कोळी भिंतीवर चढे
वरून पावसाने खाली तो पडे
सूकत जमीन सारी ऊन ते पडे
रमत गमत कोळी पुन्हा वरचढे ||

संकटे येती जाती किती संसारात
भीक त्याला न घाली तोचि भाग्यवंत
पुन्हा यत्न करतो तो ठरतो यशवंत
प्रयत्नांते यश लाभे हाचि खरा मंत्र ||

प्रयत्ने वाळूचे कण रगडणे शक्य आहे
प्रयत्नांती परमेश्वर वसे हेचि सत्य आहे
धीर सोडू नको रे यश तुझेच आहे
पुढे पुढे चालत जा यशोमंदिर आहे ||

हार-जीत हा तर खेळाचा भाग आहे
पुन्हा नव्याने लढणे हाची नेम आहे
विवेकी संयत लढती यशस्वी होत आहे
जीवनाच्या खेळाचा हाच नियम आहे ||

बुद्धिवादी तू तर हे नियम जाणतोस
जिद्दीने लढूनी संकटांना हरवतोस
नवी नवी क्षितिजे अचूक गाठतोस
थांबला तो संपला हे सत्य जाणतोस ||

कोळ्याप्रमाणे पडणे उठणे तुला जमेल
जिद्द मात्र हरू नको शेवटी यश गवसेल
राखेतूनी ‘मन फिनिक्स’ जर तो उडेल
यशाच्या शिखरावरी निश्चित विसावेल ||

*ज्योत्स्ना तानवडे*. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 2 =