You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची रविवारी कुडाळ येथे बैठक

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची रविवारी कुडाळ येथे बैठक

कुडाळ :

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बैठक रविवारी, दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. अनंत मुक्ताई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे संबोधित करणार आहेत. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी चर्चा करणार येणार आहे. सर्व फ्रंट अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, बुथ कमिटी अध्यक्ष यांच्या नेमणुका करणे, पक्षाच्या माध्यमातून विकास कामे करणे, तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन अभय शिरसाट व विजय प्रभू यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा