You are currently viewing ……तर मनसे करणार भीकमांगो आंदोलन – शहर अध्यक्ष आशिष सुभेदार

……तर मनसे करणार भीकमांगो आंदोलन – शहर अध्यक्ष आशिष सुभेदार

सा.बा.कार्यकारी अभियंत्याना मनसेचा इशारा.

गणेशोत्सवापुर्वी रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यासाठी व रस्त्यांवरील दुतर्फा झाडे-झुडपे तोडण्याबाबत आज सावंतवाडी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांंना आज निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव जवळ आलेला असताना देखील सावंतवाडी तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आहे.तोक्ते चक्रीवादळानंतर अनेक ठिकाणची रस्त्यांवरील धोकादायक झाडे-झुडपे अजुनही तोडण्यात आलेली नाहीत. सावंतवाडी ते मळगाव न्हावेली वेत्ये, सोनुर्ली,
मळेवाड पर्यंत रस्ता खड्डेमय झाला असून आरोंदा शिरोडा सातार्डा, सावंतवाडी ते इन्सुली मार्गे बांदा आणि बांदा ते मडुरा पाडलोस सातोसे व तालुक्यातील माडखोल, कारिवडे,दाणोली,सांगेली कलंबिस्त,शिरशिंगे पर्यंत जाणारा रस्ता व अन्य रस्त्यांची तर खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे.आमदार दीपक केसरकर यांनी खड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी आणलेला नाही बांद्रा ते दोडामार्ग या रस्त्याची ही दुरावस्था झाली आहे या रस्त्याची केवळ घोषणा केली.मग आलेला निधी गेला कुठे ? येत्या ३१ तारखेपुर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविले न गेल्यास सावंतवाडी तालुका मनसेतर्फे भीकमांगो आंदोलन करण्यात येईल व ३सप्टेंबरला जमा झालेले पैसे आपल्या कार्यालयात शासनाकडे देण्यासाठी सुपूर्द केले जातील.
गणेशोत्सवाला येत्या १० सप्टेंबर पासून सुरवात होत आहे.त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल होणार आहेत.वाहनांची वर्दळ वाढणार आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत.वाहनांचे नुकसान होत आहे.गेली सात वर्षे मनसे सातत्याने रस्त्यांवरील खड्यांविरोधात आवाज उठवत आहे.दोन वर्षापुर्वी मुंडण आंदोलनही केले होते.पण अजुनही रस्त्यांची दुर्दशाच आहे.सत्ताधारी लोकप्रतिनीधी निधी आणु शकत नाहीत.केवळ पोकळ आश्वासने घोषणा करत फोटोसेशन करत आहेत.त्यामुळे तालुक्यातील सार्व.बांधकामच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांना लाल दगड न वापरता पावसाळी डांबर व रोलर वापरून ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत.तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे वाहतुकीसाठी अडचणीची ठरत असल्याने वाहनांना त्रासदायक ठरणारी दोन्ही बाजूची झाडी तोडण्यात यावी.यासाठी आम्ही हे निवेदन सावंतवाडी तालुका मनसेतर्फे देत आहोत यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर तालुका सचिव विठ्ठल गावडे उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ ऋग्वेद सावंत अभय देसाई गोविंद सोनी आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा