You are currently viewing आठवण…गावाकडील गजाल…!

आठवण…गावाकडील गजाल…!

शिक्षण महर्षी मा.आबासाहेब तोरसकर….

कार्याध्यक्ष तथा शिक्षण महर्षी मा.प्रतापराव राघोबा तोरसकर तथा आबासाहेब तोरसकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाल्याची अनपेक्षीत बातमी काल कळली.ऐकून धक्का बसला.
सावंतवाडी,दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील एक पुराणवृक्ष कोसळला गेला.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात झपाटून काम करणाऱ्या एका मार्गदर्शकास ,आम्ही कायमस्वरूपी मुकलो आहोत.अशी भावना डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ,बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारीणी सदस्य श्री उल्हास देसाई यांनी व्यक्त करून त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.
मा.आबासाहेब तोरसकर व तोरसकर घराण्यातील सर्वाचे डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघावर नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध आहेत.त्यामुळे संस्थेच्या प्रत्येक कार्यात आबासाहेबाचे मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला लाभले आहे.
संस्थेचा “रौप्य महोत्सव” मुंबईत साजरा करण्याचा संस्था सरचिटणीस स्व.शांताराम शिवराम देसाई व तत्कालीन कार्यकारीणीने व सर्व सभासदांनी ठरविले.त्या करीता स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरले.त्याकरीता जाहिराती गोळा करण्यात आल्या.त्या वेळी आबासाहेब तोरसकर* यांनी बहुमोल असे सहकार्य संस्थेला दिले होते.
४-५ वर्षापूर्वी संस्थेच्या वार्षिक स्नेह संमेलनात उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते.
१९८३ ची गोष्ट.डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाने डेगवे गावात “समाज मंदिर” बांधण्याचा संकल्प केला.त्यावेळी संस्थेचे सरचिटणीस स्व.शांताराम देसाई,शंभा देसाई,हरीश्चद्र देसाई व मी त्यांच्या मुंबईतील घरी गेलो.त्यावेळी त्यांची प्रत्यक्ष माझी भेट झाली.त्या भेटीनंतर मैत्री झाली. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे वाखाणण्या जोगे काम होते. हे जवळून पहाण्याचा योग मला आला होता. अनेक संस्थात त्यांनी काम केले आहे.
सावंतवाडी संस्थान मराठा समाज,मुंबई या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर १९९२-९३ मध्ये त्यांच्या सोबत काम करण्याचा मला योग आला होता. शिवाजी मंदिरच्या अध्यक्ष पदावरहि त्यांनी काम केले आहे.त्यांना विविध क्षेत्रात पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
सिंधुदुर्गजिल्ह्यातील सावंतवाडी,दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.त्यामुळे आज किती तरी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात नाव लौकिक संपादन केले आहे.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण अभ्यास करून तो आपल्या संस्थांच्या शाळेत इंग्रजी शिक्षण राबवणे हा त्यांचा ध्यास होता. हे मी जवळून पाहिले होते.अनुभव घेत होतो. १५ दिवसापूर्वी त्याच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला होता.त्यांनी माझ्या तब्येतीची आस्तेवाईक चौकशी केली होती.आबासाहेब तोरसकर स्वभावाने बाहेरून काटेरी वाटले तरी मनाने फार हळवे होते.रसाळ फणसासारखे होते.
अशा या शिक्षण महर्षीने अखेरचा श्वास काल मुंबईत घेऊन शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना चटका लावून गेले.
समस्थ डेगवे ग्रामस्थातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबांच्या दुखःत आम्ही सहभागी आहोत.मृतांच्या आत्म्याला शांती लाभो.
🙏💐🙏💐🙏💐🙏💐
—————————————-
*✍️उल्हास बाबाजी देसाई*
——डेगवे,आंबेखणवाडी—–
—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा