कणकवली नगरपंचायत विषयसमिती सभापतींची निवड बिनविरोध…

कणकवली नगरपंचायत विषयसमिती सभापतींची निवड बिनविरोध…

कणकवली

कणकवली नगरपंचायतीच्या विषय सभापती निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. सभापती पदांसाठी सत्ताधारी गटाकडून एक-एक अर्ज आल्याने व विरोधकांनी पाठ फिरविल्याने हि निवडणुक बिनविरोधी झाली. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी निश्चित केल्याप्रमाणे महत्वाच्या बांधकाम सभापतीपदी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, तर आरोग्य सभापतीपदी अभीजित मुसळे व महिला बालकल्याण सभापतीपदी प्रतिक्षा सावंत यांची निवड झाली. पाणी पुरवठा सभापती म्हणून पदसिद्ध उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांची वर्णी लागली आहे. दोन दिवसापूर्वी उपनगराध्यक्षपदी बंडु हर्णे यांची निवड बिनविरोध झाल्याने विषय सभापती पदाच्या निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे अपेक्षित होते.

विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडीसाठी ११वा पिठासन प्राधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली. बैठकीत प्रत्येक कमिटी सदस्यांची निवड झाली. त्यानंतर सत्ताधारी गटाकडून प्रत्येक कमिटीसाठी एकेका उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केले. पाणी पुरवठा कमिटीपदी उपनगराध्यक्षाची पदसिद्ध निवड होते तरीही उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांनी पाणी पुरवठा समिती सभापती पदासाठी बंडु हर्णे यांनी उमेदवारी दाखल केली. मुख्याधिकारी विनोद डवले यांनी त्यांचे नामनिर्देशन स्विकारले.
विषय समितीच्या सदस्यांची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम, नियोजन विकास व पर्यटन समिती: मेघा अजय गांगण, विराज सुभाष भोसले, संजय मधुकर कामतेकर, राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर, सुशांत श्रीधर नाईक महिला व बालकल्याण समिती: प्रतिक्षा प्रशांत सावंत, सुप्रिया समिर नलावडे, कविता किशोर राणे, मानसी योगेश मुंज आरोग्य, वीज, शिक्षण व क्रीडा समिती: अभीजित भास्कर मुसळे, विराज सुभाष भोसले, उर्वी योगेश जाधव, सुमेधा प्रसाद अंधारी, माही मंदार परूळेकर.बाजार पाणीपुरवठा जलनि:सार समिती: गणेश सोनू हर्णे, रविंद्र बाळकृष्ण गायकवाड, अबिद अब्दुल नाईक, राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर, मानसी योगेश मुंज. सत्ताधारी गटाकडून विषय समिती सभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज तर विरोधी गटाकडून एकही अर्ज न आल्याने पिठासन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सभापतीची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा