You are currently viewing चंद्रकांत उर्फ बाळा गावडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून अधिकृतपणे जाहीर.

चंद्रकांत उर्फ बाळा गावडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून अधिकृतपणे जाहीर.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून घोषणा.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडींमुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे निष्ठावान असलेले जि प चे माजी आरोग्य सभापती, पंचायत समिती सावंतवाडीचे माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडे अधिकृत जिल्हाध्यक्ष पद दिले नव्हते.
बाळा गावडे यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर देखील त्यांच्यावर पक्षीय विरोधकांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. बाळा गावडे हे मुत्सद्दी राजकारणी असल्याने त्यांनी सर्वांना एकत्र आणत जिल्ह्यात संघटना बांधणीची सुरुवात केली. पक्षीय विरोधकांकडे जास्त लक्ष न देता वरिष्ठांची मर्जी संपादन करत त्यांनी तालुकावर अध्यक्ष निवडी करत जिल्ह्याची संघटना मजबूत केली. काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत येताच जिल्ह्याची संघटना वाढीसाठी त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा आयोजित करत वादळात नुकसान झालेल्याना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोचवीत त्यांनी जिल्हावासीयांसहित पक्षश्रेष्ठींच्या मनात स्थान मिळविले, त्याचेच फलित म्हणून आज ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधिकृत जिल्हाध्यक्ष म्हणून महत्वाची जबाबदारी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =