You are currently viewing लयभारी साहित्य समूहाची काव्यस्पर्धा आणि ई-बुक प्रकाशन सोहळा संपन्न.

लयभारी साहित्य समूहाची काव्यस्पर्धा आणि ई-बुक प्रकाशन सोहळा संपन्न.

राज्याबाहेरीलही स्पर्धकांचा होता सहभाग

स्वातंत्र्यदिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत लयभारी साहित्य समूहाच्या वतीने ऑनलाईन काव्यस्पर्धा व ई-बुक प्रकाशन सोहळा जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. कोरोनाचे नियम पाळूनच सदरची स्पर्धा पार पडली.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या काव्यस्पर्धेसाठी देशभक्तीपर काव्य, खाकी वर्दीशी निगडित काव्य अशा विषयांवर सदरची स्पर्धा घेण्यात आली होती.
मरणाची भीती तेव्हाच मेली
जेव्हा चढविली अंगावर वर्दी
तिरंग्यात लपेटून शव येता
सलाम करण्या वर्दीला झाली गर्दी
या शब्दात वर्दीतल्या वीरांना मानवंदना देण्यात आली. उपस्थित सर्व सारस्वतांनी शहीद जवानांना काव्यमय स्वरूपात आपल्या लेखणीतून श्रद्धांजली वाहिली. वर्दीतील माणुसकी जागृत ठेवणाऱ्या, सतत उन्हातानात जमसेवेसाठी उभ्या असणाऱ्या पोलीस जवानांना, सीमेवर भारत भूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी सर्व मान्यवर कवी/कावयित्रींन्नी शब्दाच्या कुंचल्यातून आपल्या भावना कवितेत व्यक्त केल्या होत्या. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात आदी राज्यातील कवींनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मा.अनिता नागे जालना, उत्कृष्ट रुकसाना मुल्ला, निपाणी कर्नाटक, प्रथम छाया ब्रह्मवंशी, गोंदिया, द्वितीय मा. विशाल पाटील, शेगाव अमरावती, तृतीय अमर चौगुले, निपाणी, उत्तेजनार्थ मा.उज्वला दिघे, मा. गीतांजली सटाणेकर, मा.रुपाली पाटील, मा.आशिष नाईक, मा.प्रांजली काळबेंडे या स्पर्धकांनी यश मिळविले. जवळपास ९० स्पर्धकांनी ऑनलाईन काव्य स्पर्धेत सहभागी घेतला होता.
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पार पडलेल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून साहित्यिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र मा. गजानन दराडे हे लाभले होते. तसेच मा.प्रा.अभय डोंगरे, एपीआय जगन्नाथ फुलवाडकर, एपीआय मधुरा भास्कर, मुंबई येथील पोलीस कवयित्री पद्मावती मथाईस, आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळख असणाऱ्या कवयित्री विमलताई माळी, गझलकार हेमंत रत्नपारखी, कवी, पत्रकार खंडू भोसले, किशोर बनसोड, या प्रमुख मान्यवरांची कवी संमेलनास उपस्थिती होती. या काव्य स्पर्धेला कवयित्री विद्या माने, कवी संतोष रायबान यांनीही आवर्जून शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धेचे आयोजन मा.अनिल केंगार, मा. प्रमोद सुर्यवंशी, मा.धनंजय माने, मा. रंजना मांगले यांनी केले. लयभारी समूहातर्फे नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यामुळे समूहाचे नेहमी कौतुक होत असते. समूहातर्फे २६ जाने २०२१ ला खाकी वर्दी या विषयावर मा.संतोष रायबान यांच्या परिक्षणाखाली, तर समूहाच्या वर्धापनदिन दिनानिमित्त मा. हेमंत रत्नपारखी यांच्या परीक्षणात पाखरांची शाळा ही अष्ठाक्षरी स्पर्धा, तर पंढरी च्या वारीचे औचित्य साधत अभंग, गौळणी, पंढरीची वारी अशा विषयांवर कविता उपक्रम घेण्यात आले होते. सदर उपक्रमांचे ई-बुक देखील प्रसिद्ध करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − nine =