You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील प्रमुख रस्ते निर्धोक करा : अन्यथा जन आंदोलन

वैभववाडी तालुक्यातील प्रमुख रस्ते निर्धोक करा : अन्यथा जन आंदोलन

भाजपा युवा मोर्चाचा इशारा

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अतिवृष्टीत ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत. तसेच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सदर रस्ते तात्काळ निर्धोक करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले आहे. सदर रस्त्यांची डागडुजी न केल्यास 27 ऑगस्ट रोजी येथील संभाजी चौकात जन आंदोलन छेडण्याचा इशाराही युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

तालुक्यातील उंबर्डे – वैभववाडी रस्ता, वैभववाडी – सडूरे शिराळे रस्ता, उंबर्डे- तिथवली रस्ता, वैभववाडी- नावळे रस्ता, कुसुर- नापणे रस्ता, सोनाळी -कुंभवडे रस्ता, भुईबावडा – जांभवडे रस्ता, कुसुर- दिगशी रस्ता. वरील रस्ते वाहतुकीस नादुरुस्त झाले आहेत. सदर रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची राहील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष किशोर दळवी, बंड्या मांजरेकर, उदय पांचाळ, वैभव कोकाटे, दत्‍ताराम सावंत, नवलराज काळे, रितेश सुतार, प्रदीप जैतापकर, संताजी रावराणे, प्रदीप नारकर व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा