You are currently viewing सरगवे पुनर्वसन येथे 30 जून ते 2 जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

सरगवे पुनर्वसन येथे 30 जून ते 2 जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

दोडामार्ग :

 

दोडामार्ग दशावतार कलाकार समितीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सरगवे पुनर्वसन येथील श्रीदेव खंडोबा सभागृहात 30 जून ते 2 जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

▪️ 30 जुन रोजी सकाळी 9.30 वा. उद्घाटन सोहळा, 10 वा. दोडामार्ग तालुक्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा सत्कार, 10 वी, 12 वी व उच्च शालांत परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, 11 वा. दशावतारी कलाकारांचा स्पर्धात्मक एकपत्री अभिनय महोत्सव.

▪️ 1 जुलै रोजी सायंकाळी 7 वा. ‘राजा रुकमांगत’ दशावतार नाट्य प्रयोग, 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वा. दशावतारी कलाकार राजेंद्र सहदेव बांदेकर यांच्या मदतीने ‘राजा डांगवी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन दशावतार कलाकार समिती अध्यक्ष सुभाष लोंढे, सचिव शंकर जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + four =