You are currently viewing मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे येथील अपघातात बुलेटस्वार जागीच ठार

मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे येथील अपघातात बुलेटस्वार जागीच ठार

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर कासार्डेहून नांदगावला जात असताना कासार्डे – ब्राह्मणवाडी येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात बुलेटस्वार दिगंबर महादेव केसरकर (वय 38 रा. कासार्डे-भोगले पारकरवाडी )यांचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर केसरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

हा अपघात सायंकाळी 5 च्या वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघातग्रस्त MH 04 JR 9696 बुलेटचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांच्यासह सुर्वे, कानसे दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा