You are currently viewing ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका मालवणवासीयांसाठी उपलब्ध करून देणार्‍या युवकांचा मालवण मनसेने केला सत्कार..

‘कार्डिअक’ रुग्णवाहिका मालवणवासीयांसाठी उपलब्ध करून देणार्‍या युवकांचा मालवण मनसेने केला सत्कार..

अवधूत परुळेकर, चेतन हरमलकर या दोघांचाही ‘आदर्श’ सत्ताधार्‍यांनी घ्यावा – तालुकाध्यक्ष विनोद सांडव

मालवण

व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका मालवणवासीयांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्यावद्दल तरुण युवक अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर यांचा मालवण मनसेच्यावतीने तालुकाध्यक्ष विनोद सांडव,तालुका सचिव विल्सन गिरकर यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मालवण पिंपळ पार येथे सत्कार केला.यावेळी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,उपतालुकाध्यक्ष उदय गावडे,तालुका सचिव विल्सन गिरकर,उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी,महिला आघाडी शहरअध्यक्षा भारती वाघ,तालुकाध्यक्षा राधिका गावडे,नंदकिशोर गावडे,गुरु तोडणकर,गुरु तोडणकर,साईराज चव्हाण,महेश मयेकर,प्रसाद परूळेकर,गणेश चिंदरकर,संतोष हळदणकर,चिंदरकर आदी यावेळी उपस्थित होते.
मालवणात ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका उपलब्ध करा अशी सर्वप्रथम मागणी ही आम्हीच केली होती.अपुर्‍या आरोग्य प्रश्नांवर मनसे राज्यसरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्‍यांनी कोरोना कालावधीच्या सुरुवातीपासूनच वेळोवेळी आवाज उठवला आहे.परंतु कुडाळ-मालवणचे आमदार अपयशी आणि निष्क्रिय असल्यानेच मालवणसाठी कार्डिअक’ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे .आज मालवणातील तरुण अवधूत परुळेकर, चेतन हरमलकर यांनी दाखवलेले धैर्य वाखणण्याजोगे असुन या दोघांचाही आदर्श सत्ताधार्‍यांनी घ्यावा असे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा